Raise Issue
Republic Day 2025

जन स्वप्नपूर्ती फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व खाऊ वाटप कार्यक्रम

२६ जानेवारी २०२५ – जन स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण आणि खाऊ वाटपाचा हा सोहळा रविवार, २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले.

Republic Day 2025 कार्यक्रमास स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीताच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यानंतर, उपस्थित लहान मुलांना आणि नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आले.

जन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे संस्थापक श्री. स्वप्निल कांतिलाल माकुडे यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की, “देशप्रेम ही केवळ भावना नसून कृतीतून व्यक्त होणारी जबाबदारी आहे. समाजसेवा आणि एकता याच तत्त्वांवर आपला देश पुढे जात आहे.”

जन स्वप्नपूर्ती फाउंडेशनतर्फे भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top