

माझ्याविषयी…
उपाध्यक्ष, भाजपा पर्वती विधानसभा मतदारसंघ,
संस्थापक, जनस्वप्नपूर्ती फाऊंडेशन
मी स्वप्निल कांतीलाल माकुडे आपल्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबातीलएक युवक आहे. समाजकारणाचे बाळकडू मला लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मिळाले. १२ वर्षाचा असल्यापासूनच मी संघाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणूनच काम केले. आज भारतीय जनता पक्षाचे काम करताना स्वतःला एखादा निष्ठावान कार्यकर्ता समजून पूर्णपणे झाेकून देऊन समाजकारण करताना माझ्या कामातूनच मी माझी ओळख निर्माण केली.
मला पहिल्यापासूनच समाजसेवेची खूप आवड हाेती. समाजसेवा करताकरताच मला पर्वती मतदार संघाच्या आमदार व राज्यमंत्री मा. माधुरीताई सतीशशेठ मिसाळ व आमचे प्रेरणास्थान बाबाशेठ मिसाळ यांच्या काम करण्याची संधी मिळाली त्यांची कामाची पद्धत व आपलेपणा पाहून प्रेरित हाेऊन त्याच्या समवेत भाजपामध्ये कार्यरत झालाे. तेव्हापासून दाेनवेळेस विद्यार्थी संपर्क प्रमुख, पुणे शहर म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पर्वती मतदार संघाची चिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली. व नाेव्हेंबर २०२३ पर्वती मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. त्याचबराेबर मी पुणे शहर पाेलीस बाॅईज ऑर्गनायझेशन महा.राज्य, संघटक अखिलतेली समाज संघटना महा. राज्य, जुन्या प्रभाग क्र. ३७ व नवीन रचनेनुसार प्रभाग क्र. ४८ शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वाॅरीअर्स, बुथप्रमुख, संसाधन जुटाना समिती, पर्वती विधान सभा मतदार संघप्रमुख अशी विविध पदे भूषवत आहे. राजकारण करण्यासाेबत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक विविध सामाजिक उपक्रमांचे आयाेजन करत विविध उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. मा. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशभर चालवलेल्या भाजपाच्या विविध याेजना कल्पना प्रत्यक्षात आणून सध्याच्या माझ्या पदाच्या कार्यकक्षा विस्तारून अधिक जाेमाने भाजप तळागाळात पाेचून या विजयी घाेडदाैड अखंडित स्वरुपात चालत राहावी यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहण्याचा माझा मानस आहे.
Connect With Me
1 week ago
2 weeks ago
2 weeks ago
2 weeks ago
9 months ago
1 week ago
2 weeks ago
2 weeks ago
2 weeks ago
9 months ago















